pune crime news  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

pune crime news : पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा संशयित आरोपी सापडला आहे. या प्रकरणाची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Akshay Badve

हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी अपडेट

नागपुरातून संशियाताला घेतलं ताब्यात

दहशतवादी पथकाने केली कारवाई

पुण्यातील हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याप्रकरणी नागपूरमधील एका संशयिताला नागपूरमधून ताब्यात घेतलं आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने संशयित आरोपीला नागपूर स्टेशनवरून ताब्यात घेतलं आहे.

पुण्याच्या हडपसरमधील रुग्णालयात बॉम्ब सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बॉम्ब निकामी केला होता. या पथकाने बॉम्ब निकामी केल्यानंतर पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या बॉम्बमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली. शिवाजी राठोड असे पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. राठोड बंगालच्या दिशेने आणि तिथून पुढे निघून जाण्याच्या तयारीत होता. त्याने पोलिसांना संशय येऊ नये म्हणून देशातील विविध रेल्वे स्टेशनचे तिकीटे काढले होते.

शिवाजी राठोड हा मूळचा सोलापूरचा राहणारा आहे. तो सध्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे. बॉम्ब ठेवल्यानंतर त्याने रेल्वेने नागपूर गाठले होते. पण विशेष म्हणजे नागपूरला जात असताना राठोडने देशातील विविध ठिकाणांचे रेल्वे तिकिटे काढली होती. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं अशी शक्यता आहे.

रुग्णालय किंवा तेथील व्यवस्थापनातील काही जणांशी झालेल्या वादातून राठोडने हे कृत्य केलं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुण्यातील हडपसर भागातील रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT