Son of NCP Leader’s Close Associate Attacked Saam
मुंबई/पुणे

पुण्यातील IT हब हादरलं, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, तडीपार गुंडांचा हैदोस

Son of NCP Leader’s Close Associate Attacked: हिंजवडी आयटीहबमध्ये अजिंक्य विनोदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी शस्त्राने वार करत जखमी केलं. पोलिसांचा तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • हिंजवडीत अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला.

  • वादानंतर आरोपींकडून हल्ला.

  • पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं.

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य विनोदे हे हिंजवडीतील जुन्या जकात नाका परिसरातील बेलबॉटम नावाच्या हॉटेलमध्ये भाडेवसूलीसाठी गेले होते. त्यावेळी अजिंक्य यांचा भाडेकरूंशी वाद झाला. संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य यांच्यावर कटर, काटे चमचे आणि शस्त्राचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात अजिंक्य गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, समाधान आणि बंटी ठाकूर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही जणांवर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

हिंजवडी पोलिसांनी तातडीने काही आरोपींना ताब्यात घेतलं. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

धनंजय विनोदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. धनंजय विनोदे यांचे पुत्र अजिंक्य विनोदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याकारणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT