Pune Helicopter Crash  Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Helicopter Crash : पुणे जिल्ह्यातील पौडनजीक हेलिकॉप्टर कोसळलं, पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO

Pune Helicopter Crash News : पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. यात हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका विमानसेवेलाही बसला आहे. आज जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही. पौडनजीक कोढांवळे गावातीस गारवा हॅाटेलनजीक ही घटना घडली आहे.

घटनास्थळावरू मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हेलिकॉप्टरने मुंबईहून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टटर हैदराबादच्या दिशेने जात होत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौडनजीक आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली. यानंतर हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळलं.

घोटावडेच्या दिशेनं येणारं हेलिकॉप्टर घटनास्थळी घिरट्या घालताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमधून चार लोक प्रवास करत होते. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना या दुर्घटनेची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजारच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं. अपघातानंतर पायलट जखमी झाले आहेत, ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला न जाण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

.हेलिकॉप्टरमधून दिर भाटिया, अमरदिप सिंग, एसपी राम प्रवास करत होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर पायलट गंभीर जखमी असून नजीकच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. कॅप्टन आनंद असं पायलटचं नावं आहे. अशी हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT