पुणे : कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही पाहायला मिळत आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून मध्यवर्ती भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे एक भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली असून ७-८ दुचाकी या होर्डिंग्जखाली अडकल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालं नाहीय.
आज सकाळपासूनच पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण दिसून आलं. हवामान विभागानं देखील पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पुण्यातील विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. विमानतळ्याच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. येथील ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत होतं. अचानक पाऊस आल्याने आणि टर्मिनलवर पाणी साचल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यानं वातावरण बदलून गेलंय. पुण्यात मुसळधार पावसात भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली ७ ते ८ दुचाकी अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून उखाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. आज सायंकाळी पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील सर्वच रस्ते जलमय झालेत. तर काही ठिकाणी वृक्ष उमळून पडलेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.