Pune hospital bomb scare latest news साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Pune : रुग्णालयात 'बॉम्ब' ठेवणारा संशयित अटकेत; आरोपीचे 'आरोग्य' कनेक्शन समोर येताच खळबळ

Pune Hadapsar News : पुण्यातील हडपसरमधील रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune hospital bomb scare latest news : पुण्यातील हडपसरमधील रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणारा संशियत आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी संध्याकाळी हडपसरमधील रूग्णालयात टायमर बॉम्ब आढळला होता, त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. सात तासांचा टायमर असलेल्या बॉम्ब समोर पाहिल्यानंतर सर्वांनाचा धक्का बसला होता. पोलिसांनी हा जिवंत बॉम्ब निकामी केला. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

पोलिसांनी रूग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असताना धक्कादायक माहिती समोर आली. एका दुचाकीवर येणाऱ्या व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत काही तासांच्या आत संशयित आरोपील्या बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांकडून त्या व्यक्तीची विचारपूस केली जात आहे.

आरोपी हा आरोग्य विभागाशी संबंधित असणारा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. एटीएस आणि पुणे पोलिसांकडून संयुक्तिक तपास सुरू आहे. जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या होत्या? बॉम्ब का ठेवला? याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. बुधवारी संध्याकाळी बॉम्ब आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखी कसून तपास करत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले.

रूग्णालयाचे अजब उत्तर

बॉम्ब ठेवल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून अजब उत्तर मिळाले. इथे अनेक लोक येतात, प्रत्येकाची आम्ही चौकशी करू शकत नाही. तो व्यक्ती ओपीडी बंद असताना आला होता. आम्ही प्रत्येकाची बॅग चेक करू शकत नाही, असे अजब उत्तर हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे हॉस्पिटलच्या आणि रूग्णाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT