Security personnel investigate after a live timer bomb was discovered inside a hospital washroom in Hadapsar, Pune. Saam tv
मुंबई/पुणे

पुण्याला बॉम्बनं उडवण्याचा कट? हॉस्पिटलमध्ये कुणी ठेवला बॉम्ब?

Timer Bomb Found In Pune Hospital Washroom: पुण्यातील एका रुग्णालयाला बॉम्बनं उडवण्याचा कट उधळून लावलाय... मात्र रुग्णालयात बॉम्ब कोणी ठेवला? पुण्यात बॉम्ब घडवण्यामागे दहशतवाद्यांचा हात आहे का? याआधी पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर कसं आलं होतं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

ही दृष्य नीट पाहा, पुण्यातल्या हडपसरच्या भरवस्तीत ऊषाकिरण या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छता गृहात हा जिंवत बॉम्ब ७ तासांचा टायमर लावून सेट करुन ठेवण्यात आला होता. हॉस्पिटलला उडवून देण्यासाठी हा कट आखल्याचं संशय आहे. मात्र सुदैवानं रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला....नेमकं काय झालं ते रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या तोंडूनच ऐकूयात...

या कटाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी कारवाईची चक्र फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतलं. हा संशयित इलेक्ट्रीक बाईकनं रुग्णालयात आल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. प्राथमिक माहितीनुसार, हा संशयित आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची माहिती समोर आलीये. या संशयितासह इतरही 13 जणांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आलीय. जिलेटीनच्या कांड्या नेमक्या कुठून आणल्या यामागे काय उद्देश होता असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. याप्रकरणी पुणे पोलीस, एटीएस आणि गुन्हे शाखेकडून संयुक्त तपासणी सुरू आहे...

या प्रकरणामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण पुण्याला दहशतवाद्यांनी यापूर्वीही टार्गेट केले आहेत.

पुण्यातील दहशतवादी कारवाया

13 फेब्रुवारी 2010

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू, 60 जखमी

1 ऑगस्ट 2012

जंगली महाराज रोडवर अर्ध्या तासात 5 स्फोट

10 जुलै 2014

विश्रामबाग पोलीस स्टेशनसमोर दुचाकीत बॉम्बस्फोट

जुलै 2023

स्लीपर सेलचे दहशतवादी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात

कोयता गॅंगची वाढती दहशत, दिवसा ढवळ्या होणाऱ्या हत्या, वाढलेलं गँगवॉर आणि आता थेट टाईम बॉम्ब ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. यामुळे पुन्हा पुणे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मात्र एखाद्या रुग्णालयात टाईम बॉम्ब का ठेवला ? यामागे नेमका हेतू काय? याची सखोल चौकशीची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT