Pune GBS Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune GBS Update : जीबीएसचा धोका वाढला, पुण्यात आणखी ४ नवे रुग्ण; एकूण २० जण व्हेंटिलेटरवर

Pune GB Syndrome : पुण्यामध्ये जी बी सिंड्रोमचा धोका वाढत आहे. आज चार नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune GBS News : पुण्यात जी बी एसच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. या आजाराने पुण्यासह राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्येही थैमान घातले आहे. आज पुण्यात ४ नव्या जी बी एस बाधित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १७० वर पोहोचली आहे.

आज (५ फेब्रुवारी) पुण्यात ४ नवे जी बी सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात १७० जी बी एसचे रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी १६२ रुग्ण हे पुणे, पिंपरी चिंचवड या भागातले आहेत. तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत अशी माहिती समोर आली आहे. रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३८ रुग्ण आहेत.

पुण्यातील जी बी सिंड्रोमने पीडित रुग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर ६१ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५ रुग्णांचा आजारामुळे मृत्यू झाला आहे. आज (५ फेब्रुवारी) नंदुरबारमध्ये जी बी एसने शिरकाव केला. तेथे दोन बाळांना जी बी सिंड्रोमचा संसर्ग झाला आहे. यातील एका बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

जी बी एसपासून वाचण्यासाठी काय करावे?

- पाणी उकळून प्यावे

- स्वच्छ आणि ताजे अन्न खावे

- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा

काय आहेत जी बी एसची लक्षणे?

- अचानक पाय किंवा हात यांना अशक्तपणा येणे

- अचानक भास किंवा अशक्त वाटणे

- अतिसार

ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी न घाबरता महापालिका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT