Pune Gauri Sambekar Killed case husband Rakesh Khedekar journey Saam Tv News
मुंबई/पुणे

बेंगळुरु-सातारा रस्त्यावर झुरळ मारण्याचं औषध पिऊन बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेलं...; राकेशचा रक्तरंजित प्रवास

Gauri Sambekar Murder Husband Journey Bengaluru-Satara : राकेश राजेंद्र खेडेकर हा मुंबई येथून बेंगळुरु येथे फेब्रुवारी महिन्यात आपली पत्नी गौरी हिच्यासह बनारगट्टा तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता.

Prashant Patil

पुणे : बेंगळुरुत आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून घराला कुलूप लावून मुंबईच्या दिशेने पळून जाणाऱ्या आरोपी पतीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली. राकेश राजेंद्र खेडेकर (वय ३५) हा मुंबई येथून बेंगळुरु येथे फेब्रुवारी महिन्यात आपली पत्नी गौरी (वय ३२) हिच्यासह बनारगट्टा तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता. राकेश हा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असून वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे २६ मार्च रोजी रात्री राकेशकडे पत्नी गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांच्यात वाद होऊन पत्नी गौरी घरातील भांडी आपटू लागली. त्यानंतर राकेशने त्याच्या पत्नीला सांगितलं की, आपण आता राहत असलेल्या रुमचं डिपॉझिट भरलेलं आहे. आपण जर आता रुम सोडली तर डिपॉझिटचे पैसे परत मिळणार नाहीत. तसेच, येथे येण्यासाठी आधीच खूप खर्च झाला आहे, असं तिला समजावत होता. तरीही गौरी त्याचे काही ऐकत नसल्यामुळे त्यांच्यात टोकाचा वाद झाला. अखेर, गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली, त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन गौरीच्या मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर वार केले, आणि त्यामध्ये गौरीचा मृत्यू झाला.

गौरी जखमी अवस्थेत घराच्या लॉबीमध्ये निपचित पडली, तिचा मृत्यू झाल्याची खात्री राकेशला झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी ट्रॅव्हल्स सुटकेस रिकामी करून त्यामध्ये गौरीच्या मृतदेहाची तुकडे टाकून ती सुटकेस घराच्या बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. काल रात्री म्हणजे २७ मार्च रोजी १२ वाजता राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याच्या मालकीची कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगळुरू येथून रवाना झाला. पत्नीचा हत्या केल्यामुळे राकेशला टेन्शन आलं होतं. त्याने एका मेडिकल दुकानांमधून फिनायल आणि झुरळ मारण्याचं औषध घेऊन कोल्हापूर, कराडच्या दिशेने प्रवास सुरु केला. राकेशनं बंगळुरू येथील इमारतीमधील खालच्या मजल्यावर राहणाऱ्या इसमाला फोन करून पत्नीच्या हत्येबाबत आणि बॅगेत मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. तो टेन्शनमध्ये विकत घेतलेलं सर्व औषधं एकत्र करुन प्यायला. त्यानंतर त्याला प्रचंड त्रास झाल्यामुळे त्याने कार थांबवली आणि तो बाहेर रस्त्यावर बसला.

राकेशला पाहून एका बाईकवाल्याने त्याची विचारपूस केली. त्यावेळी, आपण फिनायल पिल्याचं सांगितल्याने दुचाकीस्वाराने त्याला तात्काळ त्याच्याच कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याठिकाणी अगोदरच हजर असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे काय झाले याबाबत विचारणा केली असता राकेशने त्याच्या पत्नीच्या हत्येबाबतचा प्रकार सांगितला. याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी जोगळेकर हॉस्पिटलमधून आवश्यक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांना ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT