Pune Gauri Sambekar killed by husband in Bengaluru  Saam Tv News
मुंबई/पुणे

२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, २ महिन्यापूर्वी बेंगळुरुला शिफ्ट, २ दिवसांपूर्वी भांडण; अन् वैवाहिक जीवनाचा भयानक अंत

Pune Woman Murder in Bengaluru : पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची तिच्याच पतीने बेंगळुरूमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने धारदार चाकूने अनेक वार करून पत्नीचा जीव घेतला.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची तिच्याच पतीने बेंगळुरूमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने धारदार चाकूने अनेक वार करून पत्नीचा जीव घेतला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन त्याने एका ट्रॅव्हल्स सुटकेसमध्ये ते तुकडे भरले. त्यानंतर घराच्या बाथरुममध्ये ती सुटकेस टाकून त्याने तिथून पुण्याला जायला निघाला. त्यानंतर, त्याने स्वत: रस्त्यात झुरळ मारण्याचं औषध आणि फिनायल प्राशन केलं. शिरवळ शिवारात आल्यानंतर तो बेशुद्ध झाला. सातारा पोलिसांनी त्याला तात्काळ तिथून अटक केली. नेमका या थरारक हत्येचा घटनाक्रम काय आहे? तो आपण जाणून घेऊया.

नेमका घटनाक्रम काय?

राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.

एक-दोन महिन्यापूर्वीच दोघेही बेंगळुरू येथे शिफ्ट झाले होते.

कर्नाटक राज्यातील बेंगळुरूच्या हुलीमावू भागात ते राहत होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

काही दिवसांपूर्वी बेंगळुरू पोलिसांनी देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती.

दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद टोकाला पोहोचला. संतापलेल्या राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली.

हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. यानंतर त्याने सासू सासऱ्यांना फोन करून माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात त्यांना एक सुटकेस सापडली. पोलिसांना सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला.

हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्याने मुंबई जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती.

त्यानंतर तो स्वतःच्या खासगी वाहनाने बेंगळुरूवरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध आणि फिनायल प्राशन केले, त्यामुळे तो शिरवळ शिवारात बेशुद्ध झाला.

बेशुद्ध झाल्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT