Pune Ganpati Visarjan Saam
मुंबई/पुणे

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाला. ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाला.

  • ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • महिला पत्रकार व तिच्या सहकाऱ्याला शिवीगाळ व मारहाणही करण्यात आली.

  • घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला गेला आहे.

पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक पार पडली. हजारो भाविक यात सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन झाले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक प्रकार घडला. भरमिरवणुकीत ढोल ताशा पथकातील सदस्यांनी महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच २ ढोल ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणूक पार पडली. पु्ण्यातही भक्तीभावाने मिरवणूक पार पडली. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकार (वय वर्ष २०) त्यांच्या सहकाऱ्यासोबत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गेल्या होत्या.

यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला. ढोल ताशा पथकातील एका सदस्याने ढोल ताशा ट्रॉलीचे चाक महिलेच्या पायावर घातले. महिला पत्रकाराने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी पथकातील एका सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिलं.

महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत जाब विचारले असता, त्याला सुद्धा पथकातील सदस्याने शिवीगाळ करत मारहाण केली. असे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकातील २ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Artist Death : प्रसिद्ध बालकलाकार आणि भावाचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, कधी अन् कुठे?

Ujani Dam : उजनी धरणातून विसर्ग वाढवला; एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग, पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: गोदावरी नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला

Indian Idol: पुन्हा सजणार सुरांची मैफील; या दिवसापासून सुरु होणार 'इंडियन आयडल'चा नवा सीझन

SCROLL FOR NEXT