Pune Police  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

Pune Police: पुणे पोलिस गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. पुण्यामध्ये यावर्षी ७००० पोलिस बंदोबस्तामध्ये तैनात केले जाणार आहेत. तसंच पुण्यातील सर्व चौकामध्ये एआय कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

Priya More

गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. गणपतीच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पुणे पोलिस देखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. आज पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सव तयारीची माहिती दिली. गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एआय कॅमेऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ७००० पोलिस तैनात असणार आहेत. पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, १० पोलिस उपयुक्त, २७ सहायक पोलिस आयुक्त, १५४ पोलिस निरीक्षक, ६१८ सहनपोलीस निरीक्षक, ६२८६ अंमलदार, १६ स्ट्रायकर, १४ क्यू आर टी हिट, ७ बी डी डी ए स पथके, ११०० होमगार्ड, १ एस आर पी एफ कंपनी गणेशोत्सव काळात सज्ज राहणार आहे.

पुणे शहरात एकूण ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एकूण ८२ बैठक घेतल्या आहेत. प्रत्येक महत्वाच्या चौकात एआय कॅमेऱ्याचे लक्ष ठेवले जाणार आहे. चेंगराचेंगरी परिस्थिती उद्भवू नये म्हणून विशेष गर्दीवर नियोजन करण्यात आले आहे. ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर असे ७ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक यांना परवानगी देण्यात आली आहे.

पुणे शहरात २७ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. गणेशत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांवर लक्ष ठेऊन त्यांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांवर अँटी चेन स्नाचिंग पथकाचे लक्ष असणार आहे. नुकताच पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळा देखील समोर आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे पुण्यातील गणेशोत्सव काळामध्ये राज्यासह देशभरातील गणेशभक्त दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सव काळात मोठी गर्दी होते. हेच लक्षात घेऊन दरवर्षी पोलिस दलाकडून योग्य नियोजन करून कडक बंदोबस्त तैनात केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : लोकलमधील मृत्यू रोखण्यासाठी , रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय | VIDEO

Mumbai: ट्रम्प यांचं बोगस आधारकार्ड बनवून दाखवलं, आता गोत्यात आला; शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा

Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Priyanka Chopra Video : प्रियंका च्रोपाने गळ्यात गुंडाळला साप, पती निक जोनस पाहतच राहिला

DMRC Recruitment: मेट्रोत नोकरीची संधी; पात्रता १२वी पास; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT