पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात

पुणे शहरात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : शहरात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

● श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२.३० वाजता गुरुजी तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. येथील मंदिरातच गणपती विराजमान होणार आहे.

● श्रीमंत दगडुशेठ गणपती : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. ट्रस्टचे यंदा १२९ वे वर्ष आहे.

हे देखील पहा-

● अखिल मंडई गणपती : अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

● मानाचा पहिला, कसबा गणपती : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे. भाविकांना हा सोहळा घरातून पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

● मानाचा दुसरा, तांबडी जोगेश्‍वरी : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ वाजता वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

● मानाचा तिसरा, गुरुजी तालिम : मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १ वाजता उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.

● मानाचा चौथा, तुळशीबाग गणपती : मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२.३० वाजता व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गणेश याग, मंत्रजागर असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.

● मानाचा पाचवा, केसरीवाडा गणपती : मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेळी परंपरेप्रमाणे सनईचौघडा वादन होणार असल्याची माहिती मंडळाचे अनिल संकपाळ यांनी दिली.

● अथर्वशीर्ष पठणही ऑनलाइन : यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्‍य नसल्याने ट्रस्टने कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवारी दि.११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्रामयाद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

SCROLL FOR NEXT