सातारा रस्त्यांवरील टोल होणार 'टर्मिनेट' गडकरींची घोषणा; NHAI करणार टोलवसुली SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : सातारा रस्त्यांवरील टोल होणार 'टर्मिनेट' गडकरींची घोषणा; NHAI करणार टोलवसुली

सातारा रस्त्यांवरील टोल टर्मिनेट करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. कात्रज चौकातील सहा पदरीउड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : सातारा रस्त्यांवरील टोल टर्मिनेट करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. कात्रज चौकातील सहा पदरीउड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून वाहतूक कोंडीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच अडचणींमुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत. आता या रस्त्यावरही मार्ग निघाला असून रस्त्याचा टोल टर्मीनेट करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

राष्ट्रीय महामार्गाकडून त्यासाठी ५० कोटी रुपये देऊन येत्या डिसेंबरपर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागू शकते. मिळालेल्या माहितीनुसार हे टोलनाके बंद होणार नाहीत. पण तेथील टोल आता प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी गडकरी म्हणाले, कात्रज उड्डाण पुलाच्या निमित्ताने कात्रज चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय निघणार असून पुणे-सातारा रस्ता हा अडचणीचा झाला होता.

या मार्गावर अनेक अपघात होत होते. या रस्त्यावरही मार्ग निघाला असून रस्त्याचा टोल टर्मीनेट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाकडून त्यासाठी ५० कोटी रुपये देऊन येत्या डिसेंबरपर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागू शकते. त्याचबरोबर, एका उत्तम संस्थेकडून अपघाताविषयी अभ्यास चालू असून हा रस्ता उत्तम होईल असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला आहे.

रिलायन्सला दणका : आतापर्यंत टोल वसुलीतून रिलायन्स कंपनीला पैसे मिळत होते. मात्र, आता मिळत असणारा पैसा थांबणार असून टोल थेट एस्क्रो अकाउंटला जाणार आहे. त्यातुन थेट रस्त्याचे काम केले जाणार आहे. हे काम रिलायन्सच करणार आहे, परंतु टोलवसुलीचा अधिकार आता रिलायन्सला असणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT