Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात बनावट औषधांच्या रॅकेटचा भंडाफोड! बिहार ते सिक्कीम कनेक्शन उघडं, २.७५ लाखांचा साठा जप्त

Pune Food and Drug Administration Action News : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने बनावट औषध विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत २.७५ लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी ८ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akshay Badve

  • पुण्यात बनावट औषध विक्रीचा मोठा पर्दाफाश

  • एफडीएने २.७५ लाखांचा औषध साठा जप्त केला

  • ८ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • तपासात बिहार व सिक्कीम कनेक्शन उघड

सिक्कीम मधील कंपनीचे बनावट औषध तयार करुन वितरीत करणाऱ्यांसह पुण्यातील औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हे दाखल करुन, पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया, अमृत बस्तीमल जैन, मनिष अमृत जैन, रोहित पोपट नावडकर, देवेंद्र यादव, उमंग अभय रस्तोगी, महेश गर्ग, सोनी महिवाल अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीष हुकरे यांनी याबाबत माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाला सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ट्रिप्सिन या बनावट औषधाची पुणे शहरामध्ये विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या दुकानातून औषधाच्या साठ्यामधून चाचणी व विश्लेषणासाठी नमुना घेतले.

हे औषध इतर त्याने इतर दोन जणांकडून घेतले होते. याचे सगळे धागेदोरे बिहार पर्यंत गेले. अन्न व औषध प्रशासनाने बिहारमधील गोपालगंज येथील सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर यांच्याशी माहितीसाठी पत्रव्यवहार केला. या ड्रग्ज कंट्रोलर यांनी महिवाल मेडिको ही पेढी बंद असून त्यांचा परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजीच मुदतबाह्य झाल्याचे कळवले

पुढे हे कनेक्शन थेट सिक्कीम पर्यंत पोहचले. दरम्यान, टेरेंट फार्मास्युटिकल्स, सिक्कीम यांना पाठविलेल्या औषध नमुन्याचा तुलनात्मह अभ्यास करुन त्यांनी हे औषध उत्पादित केलेले नसल्याचे व त्यांचे नसल्याचे पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासनाला कळविले. मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने २ लाख ७५ हजार रुपयांचा बोगस औषधांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : धावत्या स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडरच्या संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

SCROLL FOR NEXT