Pune Firing Saam tv
मुंबई/पुणे

Pune Firing : पुण्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या चौघांवर अंदाधुंद गोळीबार, परिसरात खळबळ

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे चौघांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उरुळी कांचन येथे गोळीबाराची घटना घडली आहे. उरुळी कांचन येथील इनामदार वस्ती येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळेने तीन ते चार व्यक्तींवर गोळीबार झाला आहे. बापू शितोळेकडून अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात काळुराम गोते जखमी झाले आहेत.

बापू शितोळे यांनी केलेल्या गोळीबारात काळुराम गोते जखमी झाले आहेत. आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी काळुराम गोते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गोळीबाराच्या घटनेनंतर एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक जखमी व्यक्ती लंगडताना दिसत आहे. तर एक जण त्याला घेऊन चालला आहे. या गोळीबारातील जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे का, याची माहिती हाती आलेली नाही. पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. C

वनराज आंदेकरांच्या हत्येत अल्पवयीन मुलांचाही समावेश

काही दिवसांपूर्वी वनराज आंदेकरांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ पुरुषांसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT