Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Firing: आम्हीच कात्रजचे राजे आहोत...; कोर्टाबाहेर हल्ल्याच्या घटनेदरम्यान काय घडलं? मंदारने सांगितली आपबीती

Pune Crime News: पुण्यामध्ये तरुणावर कोर्टाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंदार किवळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर मंदार किवळे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आधी गोळीबार नंतर कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मंदारने पोलिसांना घटनेच्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती दिली. आरोपींनी मंदारवर हल्ला करताना आम्हीच कात्रजचे राजे आहोत असे म्हणत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचे धागेदोरे शोधत आहेत.

पुण्यात बुधवारी कोर्टाबाहेर मंदार किवळे या तरुणावर हल्ला झाला. या प्रकरणी रात्री उशिरा पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या हल्ला प्रकरणाची पीडित मंदारकडून माहिती घेतली. हल्ल्याचा थरार सांगताना मंदारने हल्लेखोर नेमकं काय म्हणत होते? हे फिर्यादीत स्पष्टपणे सांगितले. या हल्ला प्रकरणामुळे पुणे हादरले आहे.

मंदारने पोलिसांना घटनेच्या वेळीचा थरार सांगितला. तो म्हणाला, आधी मला तूच आमच्या शुभमला मारलं ना? असा प्रश्न दोघांनी विचारला आणि हातात असलेल्या पिस्तूलने गोळी झाडली. मात्र ती गोळी लागली नाही. त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने याच्या डोक्यात कोयते टाका असं म्हणत माझ्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर 'शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे.', असं म्हणत त्यांनी तिथून पळ काढला.

'शुभमदादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे. आम्हीच कात्रजजे राजे आहोत असे आरोपी हल्ला करत असताना म्हणत होते. आरोपींनी आधी गोळीबार केला पण गोळी मंदारला लागलीच नाही. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या कोयत्याने मंदारवर वार केले. ३ ते ४ जण मंदारच्या डोक्यावर सपासप वार करत होते. हल्ला करता ते जोरजोरात ओरडत होते. या हल्ला प्रकरणाचे थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- कोर्टाने गोळीबार आणि कोयता हल्ल्याची गंभीर दखल; पोलीस आयुक्तांना बोलावलं

Plane Crash : भयंकर! विमान समुद्रात कोसळलं, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Cricket League: पुरुष- महिला खेळाडू एकाच टीममध्ये खेळणार! 2027 मध्ये होणार अनोखी T20 लीग; झहीर खानची मोठी घोषणा

Bollywood News : मलायका अरोरानंतर अर्जुन कपूर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात ; PHOTO होतोय व्हायरल, नेमकी आहे तरी कोण?

Paneer Roll Frankie Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चटपटीत आणि चमचमीत पनीर रोल फ्रँकी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT