Pune Sanjay Matale News: Saam tv
मुंबई/पुणे

Pune Sanjay Matale News: देवदुतासारखे धावले, शेतकऱ्याच्या धाडसाने ५ जणींचे प्राण वाचले; संजय माताळेंचं सर्वच स्तरातून होतंय कौतुक

शेतकरी संजय माताळे यांनी धाडस दाखवत ५ जणींना पाण्यातून बाहेर काढले.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune News : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ७ पैकी दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामध्ये अजून मोठी दुर्घटना झाली असती पण त्याच वेळी त्या ठिकाणाहून जात असलेल्या शेतकरी संजय माताळे यांनी धाडस दाखवत ५ जणींना पाण्यातून बाहेर काढले. पण या वेळी दोन जण त्याच्या हाती न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला असे पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्यांच्या प्रसंगावदानामुळे जीवदान मिळालं आहे.

हे आहेत शेतकरी संजय सिताराम माताळे. काल सकाळी सावडण्याच्या विधी आवरून घरी जात असताना संजय सिताराम माताळे यांना अचानक धरणाच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असतात त्यांना काही मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या जीवाची परवा न करता संजय माताळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली.

तोपर्यंत त्याच्यासोबत असलेल्या त्याचे सहकारी स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय मातळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुलीने एका महिलेला एक एक करून पाण्याच्या कडेला आणले. त्यांचे सहकारी त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. असे करून त्यांनी पाच जीव वाचवले पण त्यातील दोन मुलींना वाचवू शकले नाहीत.

खडकवासला धरणाजवळ जवळ गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत या पोहण्यासाठी गेलेल्या सात मुली पोहता न आल्याने पाण्यात गेल्या. माताळे व स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे पाच मुलींना वाचविण्यात यश माञ दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला.

हवेली पोलीस तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलही दाखल झाले होते. मात्र माताळे यांनी तोवर सर्वाना बाहेर काढले होते. ही घटना कलमाडी फार्म हाऊस जवळ घडली. या सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून,पुण्यातील गोऱ्हे खुर्द या गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला होत्या आल्या होत्या.

संजय माताळे यांनी दाखलेल्या धाडसाने पाच मुलींना बाहेर काढले आणि इतर सहकाऱ्यांनी प्रथमोपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचे प्राण वाचले मात्र दुर्दैवाने प्रयत्न करून दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मात्र संजय यांनी दाखवलेले धाडस खरच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येत असून सर्व स्तरातून त्यांच कौतुक केले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: कमी खर्चातही दिसाल एकदम क्लासी! ऑफिस किंवा समारंभात 'या' ७ स्टायलिंग टिप्सने मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: वसई-विरारमध्ये गणेश विसर्जनावरून तणाव! तलावाचा गेट तोडून ग्रामस्थांनी केले गणरायाचे विसर्जन

Milk Tea : सकाळी उठताच दुधाचा चहा पिताय? सावधान! सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम एकदा वाचा

Lockdown : भारताच्या शेजारील देशात लॉकडाऊन, रात्री ८ नंतर सर्वकाही बंद; नेमकं कारण काय?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार-पेन्शनबाबत मोठ्या मागण्या; 3.84 फिटमेंट फॅक्टरसह 5 वर्षांनी रिव्हिजनचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT