Gangster Sharad Mohol Killed Saam Digital
मुंबई/पुणे

Gangster Sharad Mohol Killed: पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, कोण होता शरद मोहोळ? जाणून घ्या

Gangster Sharad Mohol Killed News: पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

Sandeep Gawade

Gangster Sharad Mohol Killed

पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान या थरारक घटनेने पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.

शरद मोहोळच्या टोळीचं कोथरूडमध्ये वर्चस्व?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मोहोळ हा इंडीयन मुजाहीदीनचा दहशतवादी दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. सिद्दीकी याची हत्या केल्यान शरद मोहोळ चर्चेत आला होता. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला. मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कोथरूडमध्ये वर्चस्व आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद मोहोळचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी मोहोळ समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ससूनमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गँगस्टर शरद मोहोळवर झालेल्या गोळीबारानंतर पुणे पोलिसांनी विविध पथक आरोपींच्या तपासासाठी रवाना केली आहेत. या गोळीबाराचा पोलीस सर्व बाजूने तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

Ravindra Dhangekar: 'कितीही कट कारस्थाने करा, मागे हटणार नाही', हकालपट्टीच्या चर्चेदरम्यान रवींद्र धंगेकरांची सूचक पोस्ट

दूध की रबर! उकळी फूटली अन् काही तासांत रबर झाला; VIDEO पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT