Pune Breaking News: पुण्यातील ससून रुग्णालयात राडा; भाजप आमदाराने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

Pune Marathi News: भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे.
Pune Breaking News
Pune Breaking NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही | पुणे ५ जानेवारी २०२४

Pune Breaking News in Marathi

पुण्यातून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात राडा झाला आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयातील उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे यांनी संतप्त झाले. त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Breaking News
Shocking News: माजी आमदाराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; नोटा मोजताना मशीन बंद, अधिकारीही थकले

मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय (Sasoon Hospital) चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, उद्घाटनाच्या पाटीवर आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांचे नाव न टाकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, आमदार सुनील कांबळे यांनी याच कार्यक्रमात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या देखील कानशिलात लगावल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच हा प्रकार घडला आहे.

उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. दरम्यान, आमदार कांबळे यांच्या या कृत्यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत सुनील कांबळे?

सुनील ज्ञानदेव कांबळे हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार होण्यापूर्वी कांबळे १९९२ पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते.

कांबळे यांनी पश्चिम बंगालच्या २०२१ च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत. भाजपचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

Pune Breaking News
Breaking News: रायगडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, भल्यापहाटे पोलिसांची कारवाई; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com