PUNE DIVORCE CASE saam tv
मुंबई/पुणे

फक्त पुण्यातच! फाटके कपडे परत देणाऱ्या पतीला पत्नीचा दणका; सोन्याच्या व्यवहारासाठी थेट सराफालाच आणले कोर्टात

Pune Divorce Case: पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. पतीने पत्नीचे कपडे चार बॅगमध्ये भरून परत केले, मात्र ते कात्रीने फाडलेले आढळले.

Akshay Badve, Omkar Sonawane

घटस्फोटाची प्रक्रिया पूर्णत्वास होता, पतीला सांगून पत्नी ने तिचे सगळे कपडे मागवले, पती ने गोळा केले आणि चार बॅग भरून तिला स्वाधीन केले. पतीवर विश्वास ठेऊन पत्नी घरी गेली मात्र बॅग उघडल्या असता तिला धक्का बसला कारण तिचे कपडे चक्क कात्रीने फाडलेले होते. उरला सुरला विश्वास गेला, पुढच्या सुनावणीत पत्नीने दागिने मागितले पण यावेळी तिने न्यायालयातच थेट शहानिशा करण्यासाठी सराफाला आणले! हा सगळा प्रकार घडला आहे पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात.

राजा (वय ३३) आणि राणी (वय ३२, दोन्ही नावे बदललेली) हे दोघेही उच्चशिक्षित, आयटी क्षेत्रात नोकरी करतात. एक जण पुण्यात तर एक जण मुंबईत. २०२३ मध्ये दोघांचे लग्न झाले विशेषतः हे लग्न "अरेंज मॅरेज". लग्नानंतर काही दिवसातच घरातील भांडी वाजायला सुरुवात झाली. किरकोळ आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेले आणि दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि परस्परसंमतीने पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

आता घटस्फोट ची प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयाकडून दोन ते तीन वेळा दोघांचे समुपदेशन झालं. दोघांकडून न्यायालयात एकच वकील देण्यात आला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना पत्नीने "माझे कपडे आणि सोन्याचे दागिने परत करा" अशी मागणी पतीकडे केली. पहिल्या सुनावणी दरम्यान पतीने कपड्यांच्या चार बॅगा घेऊन न्यायालयाच्या आवारात पत्नीच्या हातात दिल्या आणि "पुरावा" म्हणून एक व्हिडीओही काढला. कागदोपत्री भक्कम रहावं म्हणून कपडे मिळाल्याची लेखी पोच म्हणून पत्नीची स्वाक्षरी सुद्धा घेतली. पत्नीने घरी जाऊन बॅग उघडली, वर वर ठेवलेले कपडे व्यवस्थित होते. मात्र, त्या खाली ठेवलेले सगळे कपडे कात्रीने फाडल्याचे तिच्या निदर्शनास आलं.

आता वेळ सोन्याचे दागिने परत करण्याची होती. खऱ्या दागिन्याऐवजी पतीने आपल्याला खोटे दागिने दिले तर हा संशय पत्नीच्या मनात बळावला, आणि तिने थेट दुसऱ्या सुनावणीला न्यायालयात एका सराफला सोबत आणलं. सराफाने दोघांसमोर १५ तोळे दागिन्यांचे वजन केले. मात्र, अनुभवातून हुशार झालेल्या पत्नीने वजनावर समाधान न मानता दागिन्यांची शुद्धताही तपासण्याचे ठरले. त्यानुसार दोघांच्या कुटुंबातील काही सदस्य चक्क सराफासोबत त्याच्या पेढीवर गेले. तेथे तपासणीअंती सर्व दागिने खरे असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयात या दागिन्यांची पोच पावती तयार करण्यात आली आणि पत्नीने ते दागिने स्वीकारले.

कौटुंबिक वादात पती-पत्नीमधील विश्वास संपुष्टात आल्यास वैयक्तिक वस्तूंच्या देवाणघेवाणीतही अडचणी निर्माण होतात. या प्रकरणात सुद्धा असेच झाले आणि त्यामुळे या गोष्टी उद्भवल्या. कपड्यांच्याबत पतीने जाणून बुजून केल्याचं आढळून आल्यावर पत्नीने थेट सराफ व्यावसायिकाला न्यायालयात आणले, प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता दोघांना न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे अशी माहिती या दोघांच्या वकील असणाऱ्या ऍडव्होकेट भाग्यश्री गुजर मुळे यांनी दिली.

संबंधित प्रकरणात घटस्फोटाची टाइमलाईन बघा

- २०२३ मध्ये आय टी इंजिनियर असलेल्या दोघांचा विवाह झाला

- लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून मुलाला १५ तोळे सोनं देण्यात आलं

- लग्नानंतर ३ महिन्यातच दोघांमध्ये वाद सुरू

- दोघांमध्ये अगदी किरकोळ वाद. उदरहाण, आजारी पडली तर काळजी घेत नसणे, आय टी मध्ये काम असल्यामुळे एकमेकांना वेळ देत नव्हते

- लग्नाच्या १.५ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय

- ऑगस्ट २०२६ मध्ये घटस्फोटाचा न्यायालयात खटला दाखल

- दोन्ही बाजूने एकच वकील आणि ३ वेळा न्यायालयाकडून समुपदेशन

- एकत्र राहू शकणार नाही हा विचार लक्षात घेता पुणे कौटुंबिक न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर

पुण्यात प्रति दिवस १० घटस्फोटाचे प्रकरणे

पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणे, आर्थिक अस्थिरता, विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाटचाल, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आणि बदलती जीवनशैली अशा काही कारणांमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होताना दिसतोय. पुणे हे आता शिक्षणाच्या पाठोपाठ घटस्फोटाचे माहेरघर होऊ लागले आहे कारण पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात प्रति दिवस १० प्रकरणे ही केवळ घटस्फोटाची आहेत. सध्या एकत्र राहूनही संवादाचा अभाव, संशयी वृत्ती आणि एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष होणे असे काही कारणे सध्या घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याकडून न्यायालयाला देताना पाहायला मिळतात. दररोज १० प्रकरणं घटस्फोटाची येत असल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणांची "पेंडेन्सी" सुद्धा वाढली असल्याचं वकील सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू

पक्ष बदलणाऱ्या MLA-MP ला बसणार मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात रिजेन्सी कॉम्प्लेक्सवर महापालिकेचा हातोडा

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

SCROLL FOR NEXT