pune fake gang posing as arun gawli pa x
मुंबई/पुणे

Pune : मी अरुण गवळीचा पीए बोलतोय... व्यावसायिकाकडे ५ कोटींची मागणी; पुण्यात तोतया गँगचा पर्दाफाश

Pune New : बीडच्या तरुणांनी अरुण गवळीच्या नावाने एका व्यावसायिकाकडे तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले.

Akshay Badve
  • बीडच्या तरुणांनी व्यावसायिकाकडे अरुण गवळीच्या नावाने ५ कोटींची खंडणी मागितली.

  • डॅडीचे खाजगी सचिव सांगून ५ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला.

  • पुण्यात गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ ३ जणांना पकडले.

Pune Crime : 'अरुण गवळीचा पीए बोलतोय, ५ कोटी दे', असे म्हणत व्यावसायिकाकडून ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना पुण्यात गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. खंडणी मागितल्या प्रकरणी ४९ वर्षीय व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित चौरे, रोहन गवारे, सुदर्शन गायके, महेंद्र शेळके आणि कृष्ण बुधनर असे आरोपींचे नाव असून यातील ३ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचे बीडचे असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे पुण्यातील कॅम्प परिसरात ऑफिस आहे. २०२२ मध्ये यातील आरोपी सुमित चौरे यांच्याशी एका बांधकाम प्रोजेक्ट संदर्भात फिर्यादी यांचा व्यवहार झाला होता. २०२३ मध्ये एक बांधकाम पूर्ण झाले मात्र ते अनधिकृत असल्याने पुणे महापालिकेने ते तोडून टाकले. आर्थिक नुकसान झाल्याने या बाबत पुणे दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

२८ जुलै रोजी फिर्यादी यांना एका अज्ञात नंबरवरून "मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पी ए बोलतोय" असा बतावणी करणारा फोन आला. सुदर्शन गायके हे चौरे यांचे भाऊ आहेत त्यांच्याशी झालेल्या व्यवहाराबाबत तडजोड करण्यासाठी फिर्यादी यांना धमकावण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी गायके आणि त्याचा मित्र हे फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी "प्रशांत पाटील हे "डॅडी" यांचे खाजगी सचिव आहेत त्यांना तुमच्या ऑफिस मध्ये आणून बसवतो" अशी धमकी देऊन ते निघून गेले.

९ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांना पुन्हा गायके ने फोन करून "तू ५ करोड मध्ये मॅटर सेटल कर" सांगून पैशांचा तगादा सुरू केला. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार केली. ११ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांना गायके याचा फोन आला . फिर्यादी हे गायके यांना विमाननगर मधील हॉटेल मध्ये भेटायला गेले. दरम्यान, हॉटेल मध्ये गुन्हे शाखेच्या आणि लष्कर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. गायके यासोबत आलेल्या ३ जणांनी फिर्यादी यांना "पाच कोटी दे नाही तर तुला मारून टाकू" अशी धमकी दिली. याच वेळी पोलिसांनी या तीन जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३०८(४), ३५१(३), ३५१(४), ३५२, ६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; हगवणे कुटुंबांतील सदस्यांचा जामीन फेटाळला

Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

SCROLL FOR NEXT