Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: 'मी पक्षाचा अध्यक्ष, तू टॉप काढून मसाज कर'; VIDEO काढून पुण्यात महिलेला धमकी, पोलिसांनी दाखवला इंगा

Pune Massage Center Extortion Case: 'मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन', अशी धमकी देणार्‍या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

'मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन', अशी धमकी देणार्‍या आणि खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना पुण्यातील धनकवडी भागात असलेल्या एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात घडली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ४० वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा सगळा प्रकार ३ फेब्रुवारीला घडला होता. रोहित वाघमारे त्याच्या मित्रासह धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाजसाठी गेला होता. यावेळी त्याने शर्टच्या खिशात मोबाईल चालू ठेवला होता.

मसाज करत असताना वाघमारे यानं त्या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्या महिलेने ही गोष्ट करण्यास नकार दिला. महिलेने नकार दिल्यानंतर त्यानं धमकी दिली. 'मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन', अशा शब्दात त्यानं महिलेला धमकावले.

महिलेनं नकार दिल्यानंतर वाघमारेनं त्या ठिकाणी २-३ जणांना बोलावून घेतलं. यावेळी त्यानं महिलेला '२० हजार रुपये दे, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेन' अशी धमकी दिली. तसेच त्या ठिकाणी असलेल्या काऊंटरमधून पैसे घेऊन तेथून तिघंही पसार झाले. महिलेनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तपास करत रोहित गुरुदत्त वाघमारे, शुभम चांगदेव धनवटे आणि राहुल ज्ञानेश्वर वाघमारे या तिघांना अटक केली आहे. या आरोपींपैकी एक पत्रकार असून त्याचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आणि एक वृत्तपत्र असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT