pune doctor  saam tv
मुंबई/पुणे

Pune Doctor ends life : आई,वडील आणि दादा...मला माफ करा; पुण्यातील डॉक्टर तरुणीचा मृत्यूला कवटाळण्यापूर्वीचा संदेश मन हेलावून टाकणारा

Pune 25 years old Doctor ends life : पुण्यातील डॉक्टर तरुणीचा मृत्यूला कवटाळण्यापूर्वी कुटुंबीयांना पत्र लिहिलं होतं. तिने कुटुंबीयातील संदस्यांना मन हेलावून टाकणारा संदेश लिहिला होता.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील डॉक्टर तरुणीने विषारी औषध पिऊन जीवन संपवल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक फसवणूक झाल्यानंतर डॉक्टर पल्लवीने जीवन संपवलंय. याच पल्लवीने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबीयांना चिठ्ठी लिहिली होती. त्यात पल्लवीने कुटुंबीयांची माफी मागितली. तसेच मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, असेही तिने म्हटले. तिने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी कुटुंबीयांना लिहिलेला संदेश हेलावून टाकणारा आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील बिबवेवाडीत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २५ वर्षीय डॉक्टर पल्लवी फडतरे या तरुणीने आत्महत्या केली. या पल्लवीची कुलदिप सावंत नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली होती. पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर १० लाख रुपये घेतले. तसेच या तरुणाने त्याची पत्नी गरोदर असल्याचेही लपवले होते. या मानसिक धक्क्यातून पल्लवी फडतरेने जीवन संवपलं. तिने तिच्या क्लिनिकमध्येच आत्महत्या केली.

मृत्यूला कवटाळण्यापूर्वीचा कुटुंबीयांना काय संदेश दिला?

पल्लवी फडतरेने आत्महत्या करण्यापूर्वी तिने कुटुंबीयांना चिठ्ठी लिहिली होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात आई, वडील आणि भावाचा उल्लेख केला होता. मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, असे तिने शेवटच्या चिठ्ठीत लिहिलं होतं. लग्नाला नकार आणि तरुणाने आर्थिक फसवणूक केली, हा धक्का सहन न झाल्यामुळे पल्लवीने आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये असलेल्या क्लिनिकमध्येच आत्महत्या केली.

पोलिसांत गुन्हा दाखल

जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं सांगून डॉक्टर पल्लवीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्यानंतर पल्लवी फडतरेने आयुष्य संपवलं. त्यानंतर तिच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी कुलदीप आदिनाथ सावंत याच्यावर गुन्हा नोंदवला आला आहे.

दरम्यान, पल्लवीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पल्लवीच्या मृत्यूने बिबवेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT