Pune couple divorce Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

Pune couple divorce within 24 hours of marriage : पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर अवघ्या २४ तासांच्या आत वेगळं झालं. या घटस्फोटाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लग्नाच्या २४ तासांत वेगळं झालंय

प्रेम विवाह असूनही दोघांचे मतभेद टोकाला गेले

दोघांनी एकमेकांवर कोणताही घरगुती हिंसाचाराचा आरोप केला नाही

दोघांनी परस्पर सहमतीने कायदेशीर घटस्फोट घेतला

पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या २४ तासांच्या आत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर त्यांचा वाद कोर्टात पोहोचला. काडीमोड घेतलेल्या उच्चशिक्षित जोडप्याची सर्वत्र देशभर चर्चा होत आहे.

वकील राणी सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा आणि बायकोमध्ये मतभेत इतके टोकाला गेले की, त्यांनी थेट घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात घरगुती हिंसाचाराचाही आरोप करण्यात आलेला नव्हता. नवरा-बायको शांततापूर्वक कायदेशीर अटींचं पालन करत वेगळे झाले.

वकील राणी सोनावणे यांनी सांगितलं की, 'लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांचा प्रेम विवाह होता. दोघे जोडपे एकमेकांना दोन-तीन वर्षांपासून ओळखत होते. लग्नानंतर नवऱ्याने बायकोला सांगितलं की, 'मी जहाजावर काम करतो. मला कुठे पोस्टिंग मिळेल सांगता येणार नाही. तसेच मी कामानिमित्त किती वेळ बाहेर असेल, ते देखील सांगता येणार नाही'.

दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा पर्याय निवडला. कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय देण्यात आला. वकील सोनावणे यांनी आश्चर्य व्यक्त केलं की, लग्नाआधी दोघे एकमेकांना ओळखत होते, यावर कोर्टात चर्चा झालेली नाही. विभक्त झालेली तरुण ही डॉक्टर होती. तर तरुण हा इंजिनीअर होता. इंजिनीअर तरुण हा जहाजावर काम करत होता.

दोघांचा विवाह कोणत्या प्रकारचा होता?

पुण्यातील या दोघांनी प्रेम विवाह केल होता.

दोघांचं वेगळं होण्यामागचं मुख्य कारण काय?

नवऱ्याच्या नोकरीबाबतच्या वेळेमुळे मतभेद होऊन दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT