Pune DJ Vehicle Crash Saam
मुंबई/पुणे

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Pune DJ Vehicle Crash: पुण्यातील जुन्नरमध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस मिरवणुकीत भीषण अपघात. डिजे गाडीचा ब्रेक फेल होऊन बँड वाजवणाऱ्या तरुणांना धडक, एका तरुणाचा जागीच मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील जुन्नरमध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस मिरवणुकीत भीषण अपघात

  • डिजे गाडीचा ब्रेक फेल होऊन बँड वाजवणाऱ्या तरुणांना धडक, एका तरुणाचा जागीच मृत्यू

  • सहा जण गंभीर जखमी, सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांनी तातडीने कारवाई करत देवराम लांडे आणि गाडी चालकाला अटक केली

पुण्यात माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. मिरवणुकीदरम्यान डिजे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बँड वाजवणाऱ्या तरुणांवर धडकली. या अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा वाढदिवस होता. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरातून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. मात्र, या मिरवणुकीत भयंकर अपघाताची घटना घडली. डीजे गाडीचा ब्रेक झाला .

डिजे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. बँड वाजवणाऱ्या तरुणांना धडक बसली. वाहनाखाली अनेक तरूण चिरडले गेले. यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा तरुण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तरूणांना तातडीने खासगी रूग्णालयात नेले.

सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. जुन्नर पोलिसांनी देवराम लांडेसह डिजे चालकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT