Renuka Kala Kendra Daund violence news 
मुंबई/पुणे

Pune : दौंडजवळच्या कला केंद्रात पुन्हा राडा, मनोरंजनासाठी आलेल्या दोन गटात कोयत्याने हाणामारी

Renuka Kala Kendra Daund violence news : पुण्यातील दौंड तालुक्यात पुन्हा एकदा कला केंद्रात राडा झाला. रेणुका कला केंद्रात दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून साहिल बापू जाधव या युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यवत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

मंगेश कचरे, पुणे प्रतिनिधी

बारामतीमधील दौंडच्या बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये एकावर जीवघेणा हल्ला. यवत पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोल नाक्यावर रागात का पाहिले? याचा जाब विचारत चौघांनी एकावर हल्ला केला. हल्लेखोर आणि जखमी दोघेही कला केंद्रात मनोरंजनाला आले होते. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये साहिल बापू जाधव याच्यावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. मंगळवारी 14 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सव्वाचार बांधण्याच्या समोरच ही घटना घडली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्याजवळ माझ्याकडे रागात का पाहत होता? असे असे म्हणत चौघा आरोपींनी साहिल जाधव यांच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात, मानेवर आणि दोन्ही हातावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये अदिनाथ उर्फ अदित्य ईश्वर गिरमे, रोहीत राजु भिसे या दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.यातील गिरमे आणि भिसे हे दौंड तालुक्यातील पाटस येथील आहेत तर अन्य दोन अनोळखी हे दौंड तालुक्यातील वरवंड येथील आहेत.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साहिल बापू जाधव हा दौंड तालुक्यात बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये मनोरंजनासाठी गेला होता आणि त्याच वेळी ज्यांनी हल्ला केला ते देखील त्याच ठिकाणी आले होते. तिथेच त्यांचा आमना सामना झाला आणि याच वेळी पाटस टोल नाक्यावर रागात का पाहिले याचा जाब विचारत आरोपींनी बापू जाधव यांच्या वरती हल्ला केला या तो जखमी झाला.

यापूर्वी देखील 21 जुलै च्या रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील चौफुला वाखारी या ठिकाणी असलेल्या अंबिका कला केंद्रात भोरचे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब हिरामण मांडेकर यांच्यासह चौघांवर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगले चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यात बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्रामध्ये साहिल बापू जाधव याच्यावर कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय.पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Human Body Fact: हृदय शरीराच्या कोणत्या बाजूला असते?

Sillod Nagar Parishad : सिल्लोड नगरपालिका मतदार यादी वादात; अनेक मतदारांची नावे अन्य वॉर्डात गेल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवला ट्रक पाहा VIDEO

Bile duct cancer: पित्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT