Pune Daund Gunfire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Daund : पुण्याच्या दौंडमधील कलाकेंद्र गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; गुन्हा दाखल, ६ महिलाही ताब्यात

Pune Daund Gunfire : पुण्यातील दौंडमध्ये न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाला होता. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्याच्या दौंडमधील चौफुला येथील एका कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाला. या घटनेबाबतची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टमार्फत दिली. या गोळीबार प्रकरणातील नवी माहिती समोर आली आहे. अपर पोलीस अधीधक गणेश विरादार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दौंड गोळीबार प्रकरणात अपडेट दिली आहे.

पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार प्रकरणी चार जणांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

दौंडच्या वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला. सोमवारी (२१ जुलै) रात्री साडेदहा ते अकरा या सुमारास गोळीबार झाला होता. कलाकेंद्रात डान्स सुरु असताना गोळीबार झाला, पण त्यात कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सहा महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, असे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट शेअर करत दौंडमधील गोळीबार घटना अधोरेखित केली होती. या गोळीबार प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदाराचा भाऊ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याचेही रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रमी खेळा अन् जिंकलेले पैसे मला पाठवा', तरूण शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना पाठवले ५५५० रुपये

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

SCROLL FOR NEXT