Pune dam Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, खडकवासला १०० टक्के भरलं, इतर ३ धरणांची स्थिती काय?

Pune Dam Storage : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण खडकवासला आता १०० टक्के भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे.  (Latest News)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97 टक्के म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. टेमघर वगळता सर्व धरणे भरले १०० टक्के भरली आहे. (Pune News)

गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसात पुणे शहर व घाट परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चार धरणांमधील पाणीसाठी

  • खडकवासला: १०० टक्के पाणीसाठा

  • पानशेत: १०० टक्के पाणीसाठा

  • वरसगाव: १०० टक्के पाणीसाठा

  • टेमघर: ७९.२१ टक्के पाणीसाठा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pressure Cooker Cleaning: प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये घाण साचलीये? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत करा साफ!

Weather Update: 60KMPH वेगाचा सोसाट्याचा वारा अन् मुसळधार धारा; 5 दिवस 7 राज्यात धुव्वाधार पाऊस

Bhaubeej 2026 Wishes : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती! भाऊबीजेनिमित्त पाठवा हे मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश; नात्यात वाढेल गोडवा

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

SCROLL FOR NEXT