Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level Today: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, खडकवासला प्रकल्पात आतापर्यंत इतकाच पाणीसाठा जमा

Pune Dam Water Level Today: जुलै महिना अर्धा संपला तरीही पुणे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काहीच टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम, साम टीव्ही

Pune Dam Water Level Today: जुलै महिना अर्धा संपला तरीही पुणे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काहीच टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली असून अजून काही दिवस पाणीकपातीचा त्रास (Water Issues) सहन करावा लागणार आहे.

पुणे शहराला (Pune News) पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चारही धरणांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी १७ जुलैंपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे ६१ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८.६२ टीएमसीने (२८.५८ टक्के) पाणीसाठा कमी आहे. हवामान विभागाच्या (Weather Updates) अंदाजानुसार पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होईल,अशी अपेक्षा आहे.

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो.या चारही धरणांत मिळून सध्या ९.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ३१.०४ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी १७ जुलैपर्यंत या चारही धरणांत मिळून एकूण १७.६७ टीएमसी (६०.६२ टक्के) पाणीसाठा जमा झाला होता.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात सुद्धा अत्यल्प पाणीसाठा आहे. कुकडीतील पाण्यावर आंबेगाव, शिरूर, जुन्नर तसेच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यातील शेती अवलंबून आहे. यावर्षी निम्मा जुलै महिना संपना तरी पाऊस न झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्‍यांबरोबरच लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT