Pune Dahi Handi 2023 Appa Balwant Chowk two group clash Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: दहीहंडी फुटताच आप्पा बळवंत चौकात राडा; ढोल ताशा पथक अन् गोविंदामध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

Pune Dahihandi 2023 Clash: पुण्यातील आप्पा बळवंत चौकात दहीहंडी कार्यकर्ते आणि ढोल पथकांच्या वादकांमध्ये बाचाबाची झाली.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Dahihandi 2023 Clash: राज्यात गुरूवारी (७ सप्टेंबर) दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी दिली. मुंबईसह पुणे शहरातही दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान, या उत्सवाला काही ठिकाणी गालबोटही लागल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील आप्पा बळवंत चौकात दहीहंडी कार्यकर्ते आणि ढोल पथकांच्या वादकांमध्ये बाचाबाची झाली. (Latest Marathi News)

वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गुरुवारी रात्रीच्या सुमारास आप्पा बळवंत चौकात मोठा गोधळ निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यादरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात दहीहंडीचा उत्सव संपला होता. जल्लोषानंतर गोविंदा पथक आणि ढोल पथकांचे वादक आप्पा बळवंत चौकातून जात होते.

दरम्यान, किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. क्षणात या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी गोविंदा पथकातील (Dahi Handi 2023) सदस्यांनी ढोल पथकाच्या वादकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे चौकात काही काळ तणावाचं वातारवण निर्माण झालं होतं.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मधस्थ करत गोविंदा पथक आणि ढोल पथकातील वादकांमधील वाद मिटवला. यावेळी पोलिसांनी काही गोविंदाना ताब्यात घेतलं होतं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT