Dagdusheth Ganapati Temple caught on CCTV women Theft Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : मागे मागे चालत गेल्या, साडीचा पदर नकळत टाकला, पुण्यात चिमुकल्याच्या गळ्यातून चैन लंपास; CCTV VIDEO

Dagdusheth Ganpati Female Thief CCTV Footage : तक्रारदार महिला इंदापूर तालुक्तातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. रविवारी (४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील दर्शन रांगेत महिला भाविकांकडील दागिने चोरणाऱ्या दोघींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संतोष डुकरे-घाडगे (वय ३०) आणि काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. यवत रेल्वे फाटकाजवळ, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिला चोरांची नावं आहेत. याबाबत एका महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्तातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. रविवारी (४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या लहान मुलीला घेऊन दर्शन रांगेत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी माधुरी आणि काव्या हिने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी ओरबाडून नेली.

हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. दर्शनरांगेतील भाविकांनी माधुरी आणि काव्या यांना पकडलं आणि सुरक्षारकांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, पोलीस कर्मचारी काटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापूर्वी मंदिरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. चोरी करणाऱ्या याच महिला वारंवार मंदिर परिसरात फिरत असतात. मंदिर प्रशासनाचंही लक्ष या महिलांकडे गेलं नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, काल पुण्यात एका तरूणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका उच्चभ्रू तरुणाची सायबर चोरट्यांनी तब्बल ४२ लाख ९५ हजार ६३७ रुपये लुबाडलं आहेत. तरुणावर सीबीआयचे ५० खटले दाखल असल्याची बतावणी करत, लाखो रूपयांना गंडा घातला आहे. या संदर्भात तरूणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT