Pune breakup blackmail case  AI Image, Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Crime : ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड पाठ सोडेना, IT तील गर्लफ्रेंडला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pune breakup blackmail case : पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीला ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंडकडून धमकी. लग्नास नकार दिल्यावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Latest Crime News : ब्रेकअपनंतर तरुणाकडून गर्लफ्रेंडला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. लग्नासाठी नकार दिल्यानंतर तरुणाकडून गर्लफ्रेंडचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पुण्यात तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी एक्स बॉयफ्रेंडने दिल्यामुळे तरूणीने पोलिसांत धाव घेतली. तरूणीच्या तक्रारीनंतर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यातील तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी पुण्यात आयटी क्षेत्रात काम करते. आरोपी तरूणासोबत तिचे काही दिवसांपासून अफेअर होते. ब्रेकअप झाल्यानंतर त्या तरूणाने तिला ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत मुलीने सांगितलेय. पुण्यातील IT तरुणीला बॉयफ्रेंडकडून धमकीचे मेसेज आणि कॉल येत होते.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि फिर्यादी तरुणी हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या दोघांचे प्रेम संबंध होते. मागील एक वर्षापासून काही कारणामुळे दोघात वाद झाला. सततच्या वादामुळे मुलीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकअपनंतर पुन्हा गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरूणाकडून मुलीला वारंवार त्रास दिला जात होता. आरोपी तरुणाने माझ्याशी लग्न कर असा तगादा फिर्यादीने तरुणीच्या मागे लावला होता. वैतागलेल्या तरुणीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर , रिलेशनशिपमध्ये असतानाच्या फोटो आणि व्हिडिओ फॉर वेबसाईटवर व्हायरल करण्याची तरुणाने धमकी दिली. यावरून आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

SCROLL FOR NEXT