Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात महिलेची फसवणूक, पोलिस बनून आला ६ लाखांना गंडवून गेला

Pune Police: पुण्यामध्ये पोलिस बनून आला आणि एका महिलेला ६ लाख रूपयांना गंडा घातला. पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये पुणे पोलिसांच्या नावाने एका व्यक्तीने महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस असल्याची बतावणी देत पुण्यात एका महिलेला तब्बल ९ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातल्या सिंहगडरोड परिसरात घटना घडली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये पोलिस बनून आला आणि एका महिलेला ६ लाख रूपयांना गंडा घातला. पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पोलिस असल्याच्या बतावणीने पुण्यात महिलेची फसवणूक करत तिच्याकडील ६ लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन आरोपी पोलिस म्हणून आले आणि महिलेला दागिन्याची विचारपूस केली. या भागात महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने काढून पिशवीत ठेवा. त्यानंतर महिलेने पिशवीत दागिने ठेवली. पिशवीत दागिने ठेवले का नाही?, याची तपासणी करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेच्या नकळत दागिने काढून घेतले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलिस ठाण्याला भेट दिली. पुण्यातील कोथरुडमधील सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा घेण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड भागात घडलेल्या २ घटनांची दखल घेतली. त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला तसंच तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश दिले.

२ दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते. यातील पहिली घटना कर्वेनगर परिसरातील नव सह्याद्री या भागात घडली. तर दुसरी घटना डी पी रोड येथील नचिकेत सोसायटीमध्ये घडली. यातील एका घटनेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चेन दुचाकीवरून आलेल्या एकाने हिसकावून नेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT