PUNE CRIME: WOMAN’S BODY FOUND IN MULA-MUTHA RIVER, FEAR GRIPS CITY saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Woman Body Found in Mula-Mutha River : पुण्यात दापोडी येथील मुळा नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • मुळा नदीपात्रात मृतदेह आढळला.

  • पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.

  • पिंपरी चिंचवडमधील दापोडी परिसरात ही घटना घडली.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराचं नाव विद्येचं 'माहेर घराऐवजी 'गुन्हेगारीचं माहेर घर' झालंय असं म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसात कोयता हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. या हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच पुण्यातील मुळा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

पिंपरी चिंचवडमधील दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जलपरी या विशेष वाहनासह जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला आहे. संबंधित महिलेने नदीपात्रात कधी आणि कोणत्या कारणाने उडी मारली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. महिलेची ओळख पटविण्याचे सुरू आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT