Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात सैराट! भरचौकात जावयाला बेदम मारलं, लेकीचं अपहरण केलं, प्रेमविवाह केल्याच्या रागातून आईचं भयंकर कृत्य, VIDEO समोर

Pune Police: पुण्यामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आईने जावयाला बेदम मारहाण करत तिचे अपरहण केले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्यातील खेडमध्ये 'सैराट' चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये तरुणाला जबर मारहाण करत त्याच्या २८ वर्षीय बायकोचे अपहरण करण्यात आले. पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील ही धक्कादायक घटना आहे. 'सैराट' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे हा मारहाण आणि अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या आई आणि भावानेच हे धक्कादायक कृत्य केले आहे.

विश्वनाथ गोसावी आणि त्याची बायको प्राजक्ता गोसावी असे मारहाण करण्यात आलेल्या नवरा-बायकोची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विश्वनाथ गोसावीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे प्राजक्ताचे कुटुंबीय प्रचंड चिडले होते. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे अपहरण केले.

भरचौकात ही मारहाण आणि अपहरणाची घटना घडली. घटनास्थळी उपसस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यामध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह १५ जणांविरोधात अपहरण आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थानिकांचा विरोध

तहसील कार्यालयात दारू पार्टी; हातात दारूचा ग्लास अन् गाण्यावर ठुमके, VIDEO व्हायरल

Sanjay Shirsat : संजय राऊत यांना काही दिवसांनी ठाण्याच्या पागल खान्यात न्यावे लागेल; मंत्री संजय शिरसाठ यांची टीका

Walmik Karad: सुशील कराडचा खुलासा, महादेव मुंडेना ओळखतही नव्हतो; चौकशी होऊनच जाऊ द्या|VIDEO

Heavy Rain: हाहाकार! ५० तास संततधार, ४०२ गावं पुराच्या विळख्यात; रस्ते, घाट पाण्याखाली,अस्मानी संकटात १२ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT