ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात (Pune) एका १९ वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला त्याचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सततच्या त्रासाला करुन त्याने आत्महत्या केली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहीतीनुसार, १९ वर्षीय शंतनू वाडकर असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर प्रीथ यादव या युजरसोबत त्याची मैत्री झाली होती मैत्री. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. प्रीथ यादव नावाच्या इंस्टा (Instagram) युजरकडे शंतनूचे अर्धनग्न फोटो होते, ते अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने शंतनूला दिली आणि त्याच्याकडून पैसे उकळले. मात्र, वारंवार त्याला ते फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळू लागला. अखेर शंतनूने या सततच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.