Dattatray Gade Shirur Saam Tv
मुंबई/पुणे

Dattatray Gade Shirur : आमच्या पोरांची लग्न कशी होणार? दत्ता गाडेमुळे गावचं नाव बदनाम; गावकऱ्यांचा संताप

Pune Crime News : पुण्यातल्या एसटी डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. पुणे पोलीस आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. दरम्यान दत्तात्रय गाडे ज्या गावचा रहिवासी आहे, त्या गावातील ग्रामस्थांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

रोहिदास गाडगे

Pune Crime : पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेचा पोलीस शोध घेत आहेत. तो शिरूरमध्ये ऊसाच्या शेतामध्ये लपव्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ड्रोन, श्वान पथकांचा वापर करुन गाडेचा शोध सुरु आहे.

दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे ज्या गुणाट गावचा आहे, त्यातील रहिवाशांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे. दत्तात्रय गाडेमुळे आमच्या गावाचं गाव बदनाम झालं आहे. त्याच्या कृतीचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. त्याच्यामुळे गावातील तरुण-तरुणीचे भवितव्य धोक्यात आले असून आता गावच्या तरुणांची लग्न कशी होणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

आरोपी दत्तात्रय गाणे हा शिरूरमधील गुणाट येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तो तेथील ऊसाच्या शेतात लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील १०० पोलीस गुणाटमध्ये दाखल झाले आहेत. ड्रोन आणि श्वान पथकांद्वारे गाडेचा शोध घेतला जात आहे.

गुणाट गावाच्या शेतामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यासाठी पोलीस दलाचं पथक गावात दाखल झाले आहे. दरम्यान ऊसाच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आरोपीच्या शोधात पोलिसांना अडथळा येत आहे. पुणे पोलीस सकाळपासून शेतामध्ये दत्ता गाडेचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT