Pune News : काल अत्याचार, आज तगडा बंदोबस्त, तरीही महिला कंडक्टरसोबत धक्कादायक प्रकार; पुण्यात चाललंय काय?

Pune Swargate Depot Crime News : साताऱ्याहून स्वारगेटला गाडी घेऊन आलेल्या सुप्रिया फाळके या महिला कंडक्टरची बॅग आगरातून चोरीला गेली. बॅग सापडत नसल्यानं त्या हवालदिल झाल्या आहेत.
Swargate Depot female conductor Supriya Phalke bag stolen
Swargate Depot female conductor Supriya Phalke bag stolenSaam Tv News
Published On

पुणे : स्वारगेट बस डेपोत काल पहाटे ५.३०च्या सुमारास एका तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली. आरोपी दत्तात्रय गाडेने २६ वर्षीय तरुणीला गप्पांमध्ये गुंतवून, गोड बोलून बंद शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेला ३० तास उलटून गेले आहेत. पण अत्याचार करणारा आरोपी अद्याप सापडलेला नाही. ही घटना घडून जेमतेम दोन दिवसही उलटले तोवर अजून एक धक्कादायक घटना स्वारगेट डेपोत घडली आहे.

काल घडलेल्या घटनेनंतर स्वारगेट डेपोत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीही गुन्हेगार बिनधास्तपणे फिरत आहेत. पोलिसांची कोणतीही भीती स्वारगेट परिसरात जाणवत नाही. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना एसटी महामंडळातील एका महिला कंडक्टरची बॅग चोरीला गेली आहे. त्यामध्ये ३० हजार रुपयांची रोख रक्कम होती. पैसे असलेली बॅग चोरीला गेल्यानं महिला कंडक्टर सध्या तणावात आहे.

Swargate Depot female conductor Supriya Phalke bag stolen
Pune Crime: गुंडगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा दणका; मारहाण केल्यानं गेली नोकरी

काल घडलेल्या घटनेनंतर स्वारगेट एसटी डेपोत मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. त्यांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पण याही परिस्थितीत चोरटे त्यांचा कार्यभाग साधत आहेत. साताऱ्याहून स्वारगेटला गाडी घेऊन आलेल्या सुप्रिया फाळके या महिला कंडक्टरची बॅग डेपोतून चोरीला गेली. बॅग सापडत नसल्यानं त्या हवालदिल झाल्या आहेत. दरम्यान, स्वारगेट बस डेपोत कायम वर्दळ असते. अशा ठिकाणी तरुणीवर अत्याचार झाल्यानं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Swargate Depot female conductor Supriya Phalke bag stolen
Pune News : स्वारगेट डेपोतून बसमध्ये तरुणी आरोपीसोबत गेली कशी? अखेर प्रश्नाचं उत्तर आलं समोर! बसचालकाचा धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com