Student Attacked with Sickle Outside College Saam tv
मुंबई/पुणे

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Student Attacked with Sickle Outside College: पुण्यातल्या जुन्नरमध्ये कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तरुणाने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

  • लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणाने केला हल्ला

  • महेश डामसे नावाचा आरोपी घटनास्थळावरून फरार

  • गंभीर जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

रोहिदास गाडगे, पुणे

लग्नाला नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. जुन्नर शहरातील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाजवळ विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातून कॉलेजला पायी जात असलेल्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या पत्राशेडजवळ ही घटना घडली. विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. महेश डामसे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात महेशविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर निवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, मुंबईतील गोरेगावमध्ये तरुणाने आपल्या सावत्र आईवर जीवघेणा हल्ला केला. वडिलांनी दुसरं लग्न केल्याने संतप्त झालेल्या तरुणाने सावत्र आईच्या डोक्यात जिमसाठी वापरण्यात येणारी लोखंडी प्लेट घातली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अब्दुल रेहमान साबीर अन्सारी असं आरोपी तरुणाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या अन् दगडफेकीने भर चौकात गोंधळ

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

भाजपच्या दिग्गज युवा नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT