Police arrest accused in Pune Railway Station minor assault case after CCTV identification. saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: 'हाच तो,नराधम! ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो आला समोर

Pune Crime Accused Photo viral: पुणे रेल्वे स्थानकावर ४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना.

  • आरोपीला सीसीटीव्हीच्या मदतीने अटक.

  • आरोपी मध्य प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपाचा फोटो समोर आलाय. अत्याचाराची घटना ५ दिवसाआधी घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान आरोपी मध्य प्रदेशमधील राहणारा आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनवर १७ फेब्रुवारी रोजी घडली होती. अल्पवयीन मुलीची आई,वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यावेळी दोघांनी फसवून मुलीला घेऊन स्टेशनच्या आवारात अत्याचार केला.

मुलीला चॉकलेट,बिस्कीट खाण्याच्या आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचा फोटो आता समोर आलाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी शोधत घेतला. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील पीडित मुलीचं कुटुंब आई- वडील आणि चार लहान मुले ऊस तोडणीचं काम संपवून पुन्हा आपल्या गावी जात होते. ते रेल्वेने दि १६/०२/ २०२६ रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशन येथे आले.

ते स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर झोपलेले होते, त्यावेळी आरोपी त्यांच्याच शेजारी बसलेला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीय मध्य प्रदेशाला जाणार होते. त्यांची रेल्वे गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी होती, त्यामुळे ते रात्री प्लॅटफॉर्मवर झोपले होते. आरोपीने पीडित मुलगी रात्री जागी असल्याचे पाहून त्याने खाऊचे आमिष दाखवले. चॉकलेटच्या आमिषाने मुलगी आरोपीकडे गेली. त्यावेळी त्याने मुलीला आई-वडिलांपासून दूर नेले.

रात्री जेव्हा वडिलांना झोपलेल्या ठिकाणी मुलगी नसल्याने त्यांनी तिचा शोध घेतला. त्यांनी पोलीस स्टेशनवर येऊन मुलगी सापडत नसल्याचे सांगितलं. त्यानंतर Grp व RPF यांनी CCTV फुटेज पाहून पीड़ित बालिकेला शोधले. पीडित मुलीची वैद्यकिय तपासणी केली. तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा कलम 137(2,)65(2) BNS 2023 पोस्को 4, 9,10 नुसार दाखल करण्यात आला. आरोपी मध्य प्रदेश मधील राहणारा त्याला त्याच दिवशी अटक करण्यात आली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

Tiramisu Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरच्या घरी झटपट बनवा इटालियन डेजर्ट तिरामिसू, वाचा सोपी रेसिपी

उष्माघातामुळे 7 जणांचा बळी, महाराष्ट्राने गाठला तापमानाचा नवा उच्चांक

Tuesday Horoscope: कामातले वाद मिटतील, ५ राशींवर गणपती बाप्पा होणार प्रसन्न, हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT