Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पतीला मारहाण करत पत्नीसोबत संतापजनक कृत्य; पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात घडलं भयंकर

Pune Crime News: पुण्यात एका अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून (Pune News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. ही संतापजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात रविवारी (९ जुलै) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसमवेत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली.

तेथून हे दांपत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली.

या घटनेनंतर तो तरुण पसार झाला. घटनेनंतर महिलेसह तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) अज्ञात तरुणाविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मतमोजणीपूर्वी महत्त्वाचे पाऊल पाऊल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT