Pradip Kurulkar News: 'बेबी हे एअर लाँच...'; डॉ. कुरुलकर आणि पाकिस्तानी झाराचं व्हाट्सअॅप चॅटिंग उघड, राष्ट्राची माहिती दिल्याने खळबळ

Pradip Kurulkar News : डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला गोपनीय माहिती देण्याची तयारी होती, असे दोघांच्या व्हाट्सअॅप चॅटमधून उघडकीस आलं आहे
Pardeep Kurulkar
Pardeep KurulkarSaam tv

Pune News: ' डीआरडीओ'चे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला गोपनीय माहिती देण्याची तयारी होती, असे दोघांच्या व्हाट्सअॅप चॅटमधून उघडकीस आलं आहे. या व्हाट्सअॅप चॅटिंगमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

डॉ. कुरुलकर यांनी ' डीआरडीओ' ने विकसित केलेल्या अग्नी ६, मिसार्इल लाँचर, एमबीडीए, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची माहिती दिली. तसेच रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल (एसएएम), इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची माहिती डॉ. कुरुलकर यांनी झारा हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरविल्याचे माहिती समोर आली आहे. तसेच डीआरडीओच्या कामाची पद्धतही सांगितल्याचे उघड झाले आहे.

Pardeep Kurulkar
Maharashtra Cabinet Expansion: CM शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत वर्षावर तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावर चर्चा होणार?

डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी झारा हिला सरफेस टू एअर मिसाइल, ब्रह्मोस, अग्नी ६, मिसार्इल लाँचर, एमबीडीए आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, इंडियन निकुंज पराशर याबाबत चॅटिंग केल्याची माहिती एटीएस तपासात समोर आली आहे. या चॅटिंगदरम्यानचे काही फोटो व माहिती डिलीट करण्यात आले आहेत. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान वेळोवेळी केलेले चॅटिंग एटीएसने न्यायालयात दोषारोपपत्राच्या माध्यमातून सादर केले आहे.

चॅटिंग दरम्यान, झाराने डॉ. कुरुलकरांना अनेक प्रश्न विचारून माहिती काढून घेतली आहे. ब्रह्मोस हे तुमचे इनव्हेशन आहे का? असा प्रश्न विचारल्यावर माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक डिझाईन्स आहेत, अशी माहिती डॉ. कुरुलकरांनी दिली आहे.

झाराने पुढे ‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३० वर लागेल ना? असे नानाविविध प्रश्न विचारून माहिती काढली. त्यांच्या यावर याआधी देखील चर्चा झाल्याचे उघड झालं आहे. या बाबींवर आधीही चर्चा केली आहे ना, यावर डॉ. कुरुलकर यांनी हो, असे उत्तर दिले. पुढे त्यांनी 'आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत, अशी गोपनीय माहिती दिल्याचेही समोर आले आहे.

Pardeep Kurulkar
Dhule-Indore Railway Line News: धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा वक्तव्य

डॉ. कुरुलकरांनी केला होता झाराचा नंबर ब्लॉक

डॉ. कुरुलकर यांना झाराने ती युकेमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, असे सांगितले होते. पुढे तिने अश्लील मेसेज करत जवळीक वाढवली. त्यामुळे डॉ. कुरुलकर हनीट्र्रॅपमध्ये आणखी अडकत गेले.

मात्र, डॉ. कुरुलकर यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये झाराचा मोबाईल ब्लॉक केला होता. त्यानंतर तिने दुसऱ्या क्रमांकावरून ब्लॉक का केले, असा प्रश्न केला होता, असाही आरोपपत्रात उल्लेख आहे.

Pardeep Kurulkar
Nitin Gadkari on Uddhav Thackeray : 'फडणवीस नागपूरला कलंक', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गडकरी संतापले; म्हणाले...

चॅटिंगमध्ये नेमकं काय उघड झालं?

डॉ. कुरुलकरांनी झाराला ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले. तसेच ड्रोनच्या टेस्टिंगचेही व्हिडिओही पाठवले. एके सिस्टम बद्दलही माहिती दिली. तसेच फिलीफीन्सने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केल्याचेही सांगितले. अग्नी - ६ डिझार्इन त्यांनी तयार केल्याची माहिती दिली.

अग्नी ६ बाबत काय चॅटिंग केलं?

झाराने अग्नी ६ चे काम कसे सुरु केले आहे? त्याची टेस्ट कधी घेणार आहे, असा प्रश्न कुरुलकरांना केला. तर त्यावर कुरुलकरांनी नाईट फायर करणार असून धीर धरण्यास सांगितले होते. अग्नी ६ कुठे जाणार सैन्य की हवार्इदल, असा प्रश्न केल्यावर कुरुलकरांनी दोन्हीकडे सांगितले.

दोघानी काय चॅटिंग केलं?

ब्रह्मोससाठी किती व्हर्जन मॉडिफाईड करण्यात आली? झाराने असा प्रश्न विचारल्यावर डॉ. कुरुलकर यांनी मला वाटते खूप आहे. पण बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील. झाराने पुढचा प्रश्न केला की, 'बेब, डिझाईन रिपोर्ट कसा असेल? यावर कुरुलकर यांनी मी व्हाट्सअॅप किंवा मेल करू शकत नाही. तो मिळवितो आणि तयार ठेवतो, तू इथे आल्यावर दाखवतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com