Crime news  Saam Tv file pic
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात खळबळ! ३५ वर्षीय महिलेची हत्या, मृतदेह पोत्यात बांधून झुडपात फेकला

Pune Crime news : पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दिलीप कांबळे

पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळलाय. तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महिलेची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून झुडपात फेकण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी दुर्गंधी पसिरसरात पसरली. त्यानंतर आयआरबी पथकाने पोलिसांना कळवलं. पुढे पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे पोलिसांना एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील हत्या करण्यात आलेल्या महिलेचं अंदाजे वय ३५ वर्षांची असावी. पण ती नेमकी कोण? तिची हत्या कोणी केली? येथील मृतदेह कोणी आणून फेकला? याचा शोध घेणे सुरु आहे. तर दुसरीकडे ही हत्या नेमकी कशी आणि कधी करण्यात आली? याचा शोध घेणे सुरु आहे. तर दुसरीकडे ही हत्या नेमकी कशी आणि कधी करण्यात आली? द्रुतगती लगतच्या झुडपात हा मृतदेह कधीपासून आहे? याचा तपास केला जात आहे.

उल्हासनगरमध्ये सख्ख्या मामानेच मुलीची हत्या

उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी खळबळजनक घटना घडली. उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या चिमुकलीची हत्या तिच्या मामानेच केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुलीच्या आरोपी मामाला बेड्या ठोकल्या आहेत. मामाने भाचीची हत्या केल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepu Batata Bhaji Recipe: पौष्टिक शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारामध्ये राडा

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

SCROLL FOR NEXT