Pune Katraj Ghat Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Pune Crime News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन बेशुद्ध पडला. त्याला उचलण्याऐवजी चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेली २३ लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला. ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज घाटात घडली.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

Pune Katraj Ghat Crime News

गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. अशातच रणरणत्या उन्हात दुचाकीवरून निघालेल्या एका कामगाराला अचानक चक्कर आली. शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली जाऊन झोपला.

त्याला मदत करण्याऐवजी अज्ञाताने दुचाकीला अडकवलेली २३ लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला. ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज घाटातील एका वळणावर शुक्रवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलीस कात्रट घाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावात एक खासगी कंपनी आहे. कंपनीतील कामासाठी २३ लाख ५० हजारांची रोकड घेऊन कामगार कात्रज घाटातून (Katraj Ghat) निघाला होता. घाटातील एका हॉटेलजवळील वळणावर कामगाराला चक्कर आली.

त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. उन्हामुळे काही वेळ शुद्ध हरपल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली झोपून होता. दुचाकीच्या हँडलला पैशांची बॅग अडकवलेली होती.

त्याचवेळी अचानक चोरटे आले आणि त्यांनी पैशांची बॅग घेऊन पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच कामगाराने याची माहिती कंपनीच्या मालकाला दिली. यानंतर उद्योजकाने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT