Pune Crime News Update SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात पत्रकारावर गोळीबार, १५ दिवसांपूर्वीच झाला होता हल्ला

Pune Crime News Update : पुण्यात गुन्हेगारी घटनांचं सत्र सुरूच आहे. पुण्यात काल रात्री एका पत्रकारावर दोघा अज्ञातांनी गोळीबार केला.

Nandkumar Joshi

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News Update : पुण्यात गुन्हेगारी घटनांचं सत्र सुरूच आहे. पुण्यात काल रात्री एका पत्रकारावर दोघा अज्ञातांनी गोळीबार केला. महर्षी नगर परिसरातील एका हॉटेलसमोरच ही घटना घडली आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. १५ दिवसांपूर्वीच याच पत्रकारावर हल्ला झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune News) स्वारगेट परिसरात काल रात्री पत्रकार हर्षद कटारिया याच्यावर गोळीबार झाला. एका हॉटेलच्या समोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. १५ दिवसांपूर्वीच हर्षद कटारियावर हल्ला झाला होता. कटारियावरील हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणाची हत्या करून मृतदेह झुडपात फेकले

पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्तीसमोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह कालव्याजवळील झुडपात फेकून दिला.

राहुल चंद्रकांत आटोळे ( वय ३६, रा. गोसावी वस्ती, नांदेड, ता. हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हवेली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)

राहुल आटोळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसते. डोक्यावर खोलवर जखमा आहेत. राहुलचा पेरू विक्री करण्याचा व्यवसाय होता. त्याची हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यातून २ बांगलादेशी पसार, गुन्हा दाखल

पुण्यात सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन बांगलादेशी नागरिक पसार झाले आहेत. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आल्यावर विशेष शाखेने दोन्ही बांगलादेशी नागरिकांना रिस्ट्रिकशन ऑर्डर देऊन त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली.

मात्र, बांगलादेश दूतावासाने प्रतिसाद दिला नाही. आणि 'रिस्ट्रिकशन ऑर्डर' प्रमाणे गेली सात महिने सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुक्कामास असणारे दोघे बांगलादेशी ७ जून रोजी पसार झाले. दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली! भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार का? महत्त्वाचं कारणं

Children Day 2025: या विकेंडला मुलांना घेऊन जा मुंबईतील 5 प्रसिद्ध ठिकाणी, मुलं होतील भरपूर खूश

Bihar Election Results: बिहारमध्ये काँग्रेस भुईसपाट का झाली? ही चार कारणे|VIDEO

Ensure Diabetes Care: डायबिटीज मॅनेजमेंटसाठी प्रगत उपाय! एन्‍शुअर डायबिटीज केअरमुळे होऊ शकतो मोठा फायदा

Bihar Election Result: लोकसभा ते विधानसभा, चिराग पासवान बिहारच्या राजकारणात किंगमेकर

SCROLL FOR NEXT