Yerwada Jail Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News: पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

Pune Breaking News: पुण्याहून मुंबईला घेऊन येत असलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत चालत्या गाडीतून उडी टाकून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. १७ मे २०२४

पुण्याहून मुंबईला घेऊन येत असलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत चालत्या गाडीतून उडी टाकून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहू रोड परिसरामध्ये ही घडली आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हर्षद शर्मा हा येरवडा जेलमध्ये होता. विशालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित खटला अद्याप कोर्टामध्ये चालू होता. त्यामुळे १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नेण्यात आले होते.

काल दि.15 मे रोजी आरोपीला मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस त्याला घेऊन येत होते. मात्र विशालने चालत्या गाडीतून पळ काढला.आरोपी विशाल शर्मा याने देहूरोड परिसरामध्ये चालत्या रेल्वेतून उडी मारली. त्याच्या हातामध्ये बेड्या असून बेड्यांसह आरोपीने रेल्वेतून पळ काढला. या संदर्भात काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच देहूरोड पोलिसांच्या हलर्गीपणाबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

SCROLL FOR NEXT