Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कुरिअरद्वारे ड्रग्जची विक्री, १ कोटींचा साठा जप्त, तिघे अटकेत

Pune Crime Branch: पुणे ड्रग्स प्रकरणात आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अटक केलेला आरोपी कुरिअरने ड्रग्स विकत असल्याची माहिती उघड झाली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणे ड्रग्ज प्रकरणात (Pune Drugs Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला आरोपी कुरिअरद्वारे ड्रग्ज विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपी पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील ड्रग्जची विक्री करत होता. विश्रांतीवाडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ड्रग्स प्रकरणात आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अटक केलेला आरोपी कुरिअरने ड्रग्स विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी कुरिअरने ड्रग्सचा पुरवठा करत होता. आरोपीकडून कुरिअर सेवेच्या माध्यमातून ड्रग्सची विक्री सुरू होती. पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील आरोपी कुरिअरने ड्रग्ज विकत होता.

विश्वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त केली. याप्रकरणी ड्रग्स विकत असताना एकूण तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी कुरिअरने ड्रग्स पाठवत असल्याची माहिती उघड झाली होती. त्याआधारे पोलिसांनी विश्वनाथ कोनापूरेला अटक करत मोठी कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT