Pune News
Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : मोठी बातमी! अंनिसचे श्याम मानव यांना जीवे मारण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या व्यक्तीला अटक

साम टिव्ही ब्युरो

Pune crime News : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, संघटक आणि प्राध्यापक श्याम मानव यांना जिवे मारण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. श्याम मानव यांना जिवे मारण्यासाठी व्यक्ती सूरतवरून महाराष्ट्रात आला होता. रेल्वे पोलीसांनी शस्रासहीत एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकीचे एसएमएस आल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये श्याम मानव यांचा नरेंद्र दाभोळकर (Narendra Dhabolkar) करु अशी धमकी देण्यात आली होती.

धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरिष देशमुख यांनी केला होता. त्यानंतर आज, सुरतवरून ४५ वर्षांचा अनिलकुमार उपाध्य नावाचा व्यक्ती महाराष्टात आला होता.

अनिलकुमार हा सुरतवरून बंदूक घेऊन महाराष्ट्रात आला होता. पुण्यातुन सुरतला जाताना ताब्यात घेतलं आहे. पुणे परिसरात रेल्वे पोलीसांनी कारवाई केली आहे.

त्याच्याकडे विनापरवाना पिस्तुल होतं. त्याला कोर्टाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

काय आहे धीरेंद्र महाराज आणि श्याम मानव यांचा वाद

काही दिवसांपूर्वी नागपुरात धीरेंद्र कृष्ण महाराज यांची राम कथा आणि दिव्य दरबार झाले होते. या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवतात असा अंनिसने आरोप केला होता.

धीरेंद्र कृष्ण महाराज नागपुरात असतानाच अंनिसने त्यांना दिव्य शक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये मिळवा असे आव्हान दिले होते. ज्यानंतर त्यांच्यामध्ये हा वाद सुरू झाला होता. या वादानंतर श्याम मानव (Shyam Manav) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज रेल्वे पोलिसांनी त्यांना जिवे मारण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT