Baramati Police Raids Lodge Saam TV
मुंबई/पुणे

Baramati News: बारामतीत १५ लॉजची पोलिसांकडून अचानक तपासणी; अनेक प्रेमी युगुलं सापडली, त्यानंतर...

Police Raids Lodge: बारामती शहरातील विविध लॉजवर महाविद्यालयीन तरुणी आणि प्रेमी युगुलांचं येण्याचं प्रमाण वाढलं असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

Baramati Police Raids Lodge: बारामती शहरातील विविध लॉजवर महाविद्यालयीन तरुणी आणि प्रेमी युगुलांचं येण्याचं प्रमाण वाढलं असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. माहितीवरुन पोलिसांनी गुरूवारी (२८ एप्रिल) अचानकच पंधराहून अधिक लॉजची सरप्राईज तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती आढळून आले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) अचानक केलेल्या या कारवाईमुळे लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर लॉजवर जाणाऱ्या प्रेमीयुगुलांना सुद्धा चांगलीच धडकी भरली आहे. या कारवाईत भोईटे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक, तालुका पोलिस ठाण्याचे प्रभाकर मोरे यांच्यासह महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुसंख्य लॉजमध्ये चुकीच्या बाबी चालत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्या अनुषंगाने ही तपासणी करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले. महाविद्यालयीन युवक युवतींना समज देऊन सोडण्यात आले. त्यात काही अॅकेडमीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही सहभाग होता.

दरम्यान, अल्पवयीन मुलांना पैसे घेऊन रुम दिल्याचा प्रकार आढळल्यास लॉजचालकांवर कारवाई (Crime News) केली जाईल, असा इशारा आनंद भोईटे यांनी दिला आहे. दरम्यान नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांनाही इमारतीचे बांधकाम, त्याच्या तांत्रिक बाबी तपासण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यापुढे अचानकपणे या तपासण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत असे भोईटे यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT