Pune Crime News
Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : कॉफीमधून गुंगीचं औषध दिलं अन्.., विवाहित महिलेसोबत केलं संतापजनक कृत्य

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात (Pune Crime) एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीने व्यवसायात भागीदारी देण्याचं अमिष दाखवून महिलेला घरी बोलावून घेतलं. त्यानंतर कॉफीमधून गुंगीचं औधष देत महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय ३१ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीची कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली होती. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्रमार्फत तक्रारदार महिलेशी ओळख झाली.

फिर्यादी महिला केटरींगच्या व्यवसायात असल्यामुळे दोघांनीही हॉटेल सुरू करण्याचे ठरवले. दरम्यान यासंबंधी चर्चा करण्यासाठीच आरोपीने फिर्यादी महिलेला खराडी भागात घरी बोलावले होते. घरी आल्यानंतर आरोपीने महिला कॉफी मध्ये गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, महिलेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनगर पोलिसांनी आरोपी अजयसिंग विजयसिंग ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Rules: चालत्या ट्रेनमध्ये 'या' गोष्टी केल्यास तुम्ही घरात नाही तर थेट तुरुंगात

Brushing Tips: दातांच्या हेल्दी आरोग्यासाठी जाणून घ्या, किती मिनिटे ब्रश करावा

Today's Marathi News Live : ही लढाई देशासाठी; उद्धव ठाकरे जालन्यातून कडाडले

Navneet Rana: हैदराबादमध्ये येते कोण अडवते बघतेच..., नवनीत राणा यांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

Lok Sabha Election : ऐन निवडणुकीत मतदान ओळखपत्र आढळली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; जालना शहरातील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT